झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको ही प्रेक्षकांची लाडकी मालिका या ना त्या कारणाने सतत चर्चेत असते.सध्या या मालिकेत सौमित्र आणि राधिकाची लगीघाई दाखवली जातेय. सौमित्र -राधिकाच्या साखरपुडा नुकताच पार पडला आणि यानिमित्ताने एका नव्या सदस्यांची एंट्री या मालिकेत झाली आहे. आणि ही व्यक्तीरेखा आहे सौमित्रच्या आईची.विशेष म्हणजे सौमित्रच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री तब्बल ४० वर्षानंतर इंडस्ट्रीमध्ये पुनरागमन केलं आहे. कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #mazhyanavryachibayko